MP Raksha Khadse axed Nathabhau | खासदार रक्षा खडसेंनी केले नाथाभाऊंचे औक्षण

खासदार रक्षा खडसेंनी केले नाथाभाऊंचे औक्षण

ठळक मुद्देभाजपातच राहणार असल्याचे रक्षा खडसेंनी आधीच केले आहे स्पष्टराष्ट्रवादीत प्रवेश अन घरी भाजप आप्तस्वकीयांकडून स्वागतराजकीय वृत्ताकनासाठी केंद्रबिंदू ठरतोय खडसे परिवारमतीन शेख
मुक्ताईनगर : भाजपातून राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर दसऱ्याला रविवारी दुपारी घरी पोहोचलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कोथळी येथील घरात प्रवेश करताच त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. याप्रसंगी सासू मंदा खडसे व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

एकनाथराव खडसे यांच्या भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघनापूर्वी मी व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खासदार रक्षा खडसे भाजपात राहतील, असे स्पष्ट केले होते. त्याच दरम्यान खासदार खडसे यांनीही भाजपात राहणार असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, आजचा प्रसंग बाका होता. खडसे सध्या राज्यात राजकीय वृत्ताकनासाठी केंद्रबिंदू ठरत आहे, त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश आणि घरी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याकडून औक्षण करून स्वागत असे चित्र रविवारी दुपारी पाहायला मिळाले. एक मात्र नक्की येथे राजकारणावर कुटुंब आणि संस्कृती भारी पडले.

Web Title: MP Raksha Khadse axed Nathabhau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.