शिक्षणाच्या पंढरीत खासगी क्लासेसची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 07:52 PM2019-12-22T19:52:26+5:302019-12-22T19:53:37+5:30

‘शिक्षणाची पंढरी’ अशी ओळख असलेल्या जामनेरात गेल्या काही वर्षात खासगी क्लासेसची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 Moving Specialty Classes in Education | शिक्षणाच्या पंढरीत खासगी क्लासेसची चलती

शिक्षणाच्या पंढरीत खासगी क्लासेसची चलती

Next
ठळक मुद्देजामनेरची स्थितीशैक्षणिक दर्जा खालावतोयमान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकांनी खासगी क्लास न घेण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती

मोहन सारस्वत
जामनेर, जि.जळगाव : ‘शिक्षणाची पंढरी’ अशी ओळख असलेल्या जामनेरात गेल्या काही वर्षात खासगी क्लासेसची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी शाळेऐवजी क्लासेसमध्येच हजेरी लावून शिक्षण घेत असल्याचे दिसत आहे. परिणामी शाळेतील उपस्थिती रोडावल्याचे दिसते.
पूर्वी शहरातील शाळेतील शिक्षक खासगी शिकवणी घेत असत. संस्थाचालकांनी घातलेल्या निर्बंधानंतर शाळेतच जादा क्लासेसला मान्यता देण्यात आली होती. गेल्या सात-आठ वर्षात खासगी क्लास सुरू झाले. सुरुवातीला ही संख्या कमी होती. कालांतराने जसजशी विद्यार्थी संख्या वाढत गेली, तसतशी क्लासेसची संख्यादेखील वाढली. सद्य:स्थितीत शहरात ३५ खासगी क्लासेस असावेत. सर्वच क्लासेसमध्ये कमी-अधिक प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे.
शहरात सहा माध्यमिक शाळा, तीन कनिष्ट व दोन वरिष्ठ महाविद्यालयांसह तीन व्यावसायिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये आहेत. एकेकाळी शाळेत मिळणाऱ्या शिक्षणातून गुणवत्ता यादीत झळकणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने अकरावी, बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी बाहेरून येथे येत. दहावी बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहूून जास्त गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती, त्यात आता घट आल्याचे दिसत आहे.
शाळांमध्ये मिळणाºया शिक्षणावर विसंबून न राहता जास्तीचे ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थी क्लासेसकडे वळत असावे, असे पालकांमध्ये बोलले जात आहे. असे असले तरी काही शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवला आहे.
खासगी क्लासेस का वाढली?
डीएड बीएड पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असून त्या प्रमाणात नोकºया मिळत नसल्याने शिक्षक होण्याची इच्छा बाळगून असलेले तरुण सहकाºयांच्या मदतीने क्लासेस सुरू करतात व त्यातून उदरनिर्वाहाचा मार्ग निवडताना दिसतात. काही सेवानिवृत्त शिक्षकांनी क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचे काम पुढे सुरू ठेवले आहे. शिक्षक होण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नाही, त्यासोबतच आणखी काही द्यावे लागते. याची जाणीव बेरोजगारांना होऊ लागल्याने गेल्या काही वर्षात डीएड, बीएड महाविद्यालयात प्रवेश घेणाºयांची संख्यादेखील कमी होत आहे.
राजकारणाचा विपरित परिणाम
पूर्वी शिक्षण संस्थांचे पदाधिकारी राजकारणाचे जोडे बाहेर ठेऊन काम करीत असल्याने संबांधित शाळेतील शिक्षणाचा दर्जा कायम होता. कालांतराने राजकारण शैक्षणिक कामात शिरल्याने त्याचे दूरगामी परिणाम शिकविण्यावर व एकूणच निकालावर दिसू लागले आहेत. शिक्षकांमधील राजकीय गटबाजी वाढत असल्याने शिकविण्यावर परिणाम दिसून येतो, परिणामी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी क्लासेसची गरज भासू लागल्याने क्लासेसची संख्या वाढली असावी, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

आकडे बोलतात
शाळा, महाविद्यालयातील संख्या १२ हजार
खाजगी क्लासेसमधील विद्यार्थी संख्या ५ हजार
माध्यमिक शाळा ६
कनिष्ठ महाविद्यालय २
वरिष्ठ महाविद्यालय २
व्यावसायिक महाविद्यालय ३

शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. शाळेत मिळणाºया ज्ञानाव्यतिरिक्त जास्तीचे मिळणारे ज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा खाजगी क्लासेसकडे ओढा वाढत आहे. तसेच काही शाळांमध्ये शिकविण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळेदेखील विद्यार्थी क्लासेसकडे वळतात. मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षक खासगी क्लास घेऊ शकत नाही. यासाठी जिल्हा परिषदेने भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे.
-विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी, जामनेर

Web Title:  Moving Specialty Classes in Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.