जुुगार अड्डे शेतात हलवल्याने शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:12+5:302021-06-03T04:13:12+5:30
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. प्रवीण मुंडे यांनी पदभार घेतल्यानंतर अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी कंबर कसली होती. परंतु सीमावर्ती ...

जुुगार अड्डे शेतात हलवल्याने शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. प्रवीण मुंडे यांनी पदभार घेतल्यानंतर अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी कंबर कसली होती. परंतु सीमावर्ती गावात अवैध धंदे बंद न होता जोर धरू लागले आहेत. अंतुर्ली हे गाव मध्य प्रदेशाच्या सीमेला लागून आहे. यामुळे मध्य प्रदेशात अवैध धंदे बंद असल्याने तिकडील जुगारी, सटोडे, पत्ता, सट्टा खेळण्यासाठी अंतुर्ली येथे येतात. त्यामुळे या भागात मोटारसायकल चोरी, शेती साहित्य चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सीमेला लागून असल्याने या भागात सर्वच प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत.
मध्य प्रदेशातून या भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी होत असते. या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन बनत चाचली आहे. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या धंद्यांना आळा घालण्याची मागणी पालक वर्गाने केली आहे.