म्हसावद येथे रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:34+5:302021-09-24T04:19:34+5:30
म्हसावद येथील एरंडोल रस्ता हा गेल्या काही दिवसापासुन अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या ...

म्हसावद येथे रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन
म्हसावद येथील एरंडोल रस्ता हा गेल्या काही दिवसापासुन अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. या खराब रस्त्यामुळे नित्याचेच छोटे-मोठे अपघात घडत असतात. या नित्याच्या कटकटीला येथील ग्रामस्थ वैतागल्याने अखेर ग्रामस्थांना येथील चौफुलीवर रास्ता रोकोचे शस्त्र उपसावे लागले. या वेळी आंदोलकांनी रस्ता दुरुस्तीसाठी मोठमोठ्या घोषणाही दिल्या. या वेळी सरपंच गोविंद पवार, उपसरपंच, शीतल चिंचोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील, विकास पाटील, महेन्द्र चिंचोरे, कल्पेश शिरोडे, अरविंद नवाल, गणेश पाटील, कैलास चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चव्हाण, श्रीराम धनगर, बापू धनगर, इदल भोई, संजय मोरे, विजय कटारिया, विकी चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.