जळगाव : राज्यामध्ये बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय समाजावर दिवसेंदिवस अन्याय-अत्याचार वाढत असल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच अत्याचार करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजेंद्र खरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलांना मारहाण करणाºया मुलांवर कारवाई करण्यात यावी, लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथेही मातंग समाजाच्या कुटुंबाला मारहाण करणाºयांवरही कारवाई व्हावी, नारायणगाव येथे कैकाडी समाजावर अत्याचार करणाºया दोषींवर कारवाई करावी, धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच समता नगरातील बालिकेवर अत्याचार करणाºया आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बहूजन क्रांती मोर्चाचे जळगाव शहर अध्यक्ष सुनिल देहडे, तालुका अध्यक्ष सुकलाल पेंढारकर, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष योगेश तायडे, अजित भालेराव उपस्थित होते.
जळगावात बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 19:54 IST
राज्यामध्ये बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय समाजावर दिवसेंदिवस अन्याय-अत्याचार वाढत असल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच अत्याचार करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
जळगावात बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन
ठळक मुद्देबहुजनांवरील अन्याय व अत्याचाराचा केला निषेधअत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीजिल्हाधिका-यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन