पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:16+5:302021-06-26T04:13:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने ७ मे रोजी शासन निर्णय काढून मागासवर्गीयांची पदोन्नती रद्द करण्यात आली आहे. ...

Movement for cancellation of promotion reservation | पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने आंदोलन

पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने ७ मे रोजी शासन निर्णय काढून मागासवर्गीयांची पदोन्नती रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय रद्द करून पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी दोन वाजता आंदोलन केले.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण रद्द केले असून, ते तातडीने परत करण्यात यावेत, या मागणीसाठी समता दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. पी. केदार, कास्ट्राईब शिक्षक प्रा.जि. प.चे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे रवींद्र तायडे, कास्ट्राईब शिक्षक माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष संजीव निकम, कास्ट्राईब भूमि अभिलेखचे संदीप हिरोळे, कृषी कर्मचारी उपाध्यक्ष मिलिंद बोल्हे उपस्थित होते.

Web Title: Movement for cancellation of promotion reservation