रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST2021-09-14T04:18:59+5:302021-09-14T04:18:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रेल्वे खाजगीकरण विरोधात १३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरदरम्यान विरोध ...

रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रेल्वे खाजगीकरण विरोधात १३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरदरम्यान विरोध सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी याची गेट मीटिंगने मुख्य शाखेतर्फे सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वेत होणारे खासगीकरण थांबविण्यात यावे, रेल्वेत लवकरात लवकर स्थानिक बेरोजगार युवकांना नोकऱ्या देण्यात याव्या, अशा मागण्याही करण्यात आल्या.
याप्रसंगी सीआरएमएसचे मंडल अध्यक्ष व्ही. के. समाधिया, मंडल सचिव एस. बी. पाटील, मंडल समन्वयक पी. के. रायकवार,
मंडल कोषाध्यक्ष एस. के. दुबे, मुख्य शाखा अध्यक्ष विशाल खरे, सचिव संजय भारंबे, युवा अध्यक्ष जयेश ढाकणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सीआरएमएसतर्फे एमओएच गेटसमोर रेल्वेत खासगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करताना व्ही.के. समाधिया, एस. बी. पाटील, संजय भारंबे, विशाल खरे आदी. (छाया : श्याम गोविंदा)