मालेगावच्या साप्ताहिकातील मजकुराविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST2021-09-10T04:23:14+5:302021-09-10T04:23:14+5:30
जळगाव : ‘मालेगाव मित्र’ या साप्ताहिकाने सोनार समाजाविरोधात लिखाण केल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेने ...

मालेगावच्या साप्ताहिकातील मजकुराविरोधात आंदोलन
जळगाव : ‘मालेगाव मित्र’ या साप्ताहिकाने सोनार समाजाविरोधात लिखाण केल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी आंदोलन केले आहे. तसेच यात सुवर्णकार व सराफ व्यावसायिकांविरोधात चुकीचे शब्दांकन केल्याचा आरोप सुवर्णकार सेनेने केला.
या साप्ताहिकातील लिखाणाचा निषेध करण्यात आला आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले. तसेच कारवाई न झाल्यास राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संजय विसपुते, विजय वानखेडे, प्रशांत विसपुते, संजय पगार, इच्छाराम दाभाडे, नंदू बागुल, सुभाष सोनार, पंकज विसपुते, योगेश भामरे, दीपक जाधव, विजय बागुल, गोकुळ सोनार, विनोद विसपुते, गणेश दापोरेकर, विनोद सोनार, रमेश सोनार, संजय दुसाने, विलास बाविस्कर, बापू सोनार, उमेश विसपुते, बबलू बाविस्कर, भगवान सोनार, पंकज रणधीर, रूपाली वाघ, शशिकांत जाधव, सुरेश सोनार, रोहन सोनार उपस्थित होते.