मोटरसायकलस्वार अपघातात ठार : वाघोद्याजवळची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:57 IST2020-08-11T14:57:37+5:302020-08-11T14:57:43+5:30
गाते गावात शोककळा

मोटरसायकलस्वार अपघातात ठार : वाघोद्याजवळची घटना
सावदा : येथून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन मार्गावर असलेल्या लहान वाघोदा गावाजवळ असलेल्या बस स्थानकासमोरच १० रोजी संध्याकाळी ६;३० वाजेच्या सुमारास जीपने मोटरसायकलस्वारास समोरून धडक दिल्याने २९ वर्षीय युवक जागीच ठार झाला. तो गाते येथील रहिवासी होता. त्याच्या निधनाने गाते गावावर शोककळा पसरली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की; मयूर राजेंद्र तायडे ( कोळी ) हा गाते येथील तरुण संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सावदा येथून घरी परतीच्या वेळेस मोटारसायकलवरून जात असताना लहान वाघोद्या जवळच जीपने (एम.टी.१२-डि सी ०४६९) मोटारसायकलस्वारास जबर धडक दिल्यान मोटरसायकल चालकास डोक्यास जबरदस्त दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. मात्र बोलेरो वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच स.पो.नि .राहुल वाघ, पीएसआय राजेंद्र पवार यांनी धाव घेतली. शवविछेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याबाबत आकाश शांताराम तायडे (कोळी ) यांनी खबर दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.