पाचोरा येथे पेट्रोल पंपावर मोटर सायकलीने घेतला पेट
By Admin | Updated: May 24, 2017 18:09 IST2017-05-24T18:09:17+5:302017-05-24T18:09:17+5:30
मोटर सायकल जळुन खाक. मोठा अनर्थ टळला
पाचोरा येथे पेट्रोल पंपावर मोटर सायकलीने घेतला पेट
ऑनलाईन लोकमत
खडकदेवळा, ता.पाचोरा, दि.24 - पाचोरा शहरातील जळगाव रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर मोटर सायकल एम.एच.20 डी.के.5208 या दुचाकीमध्ये मध्ये पेट्रोल भरत असतांना पेट्रोल इंजिनवर पडल्याने दुचाकीने पेट घेतला. पेट्रोल पंपावर कर्मचा:यांनी पेटलेली दुचाकी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
बुधवारी दुपारी एमएच 20 डीके 5208 या दुचाकीसह चालक पेट्रोल भरण्यासाठी आला. पेट्रोलची टाकी फुल्ल होऊन पेट्रोल इंजिनवर पडले. त्यामुळे दुचाकीने पेट घेतल्याने एकच धावपळ सुरु झाली. या प्रकारानंतर दुचाकीचालक घटनास्थळावरून पसार झाला. याच पेट्रोल पंपाच्या शेजारी मोठया प्रमाणात रहिवाशी आहेत थोडय़ा अंतरावर दुसरा पेट्रोल पंप सुध्दा होता. मात्र कर्मचा:यांनी समयसुचकता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.