सुनेच्या खून प्रकरणात सास:याला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 00:30 IST2017-02-09T00:30:41+5:302017-02-09T00:30:41+5:30

न्यायालय : उसनवारीच्या पैशावरुन झाला होता खून

Mother's murder case: Mother's life imprisonment | सुनेच्या खून प्रकरणात सास:याला जन्मठेपेची शिक्षा

सुनेच्या खून प्रकरणात सास:याला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव : उसनवारीचे पैसे परत घेण्याच्या कारणावरुन सुनेचा खून केल्याच्या गुन्ह्यात सासरा काळू रामू मांडवकर (वय 72, रा.पाळधी, ता.धरणगाव) यास न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयाने मंगळवारी जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. मांडवकर याला सोमवारी न्यायालयाने कलम 302 अन्वये दोषी ठरविले होते.
या घटनेची माहिती अशी की, मांडवकर याने सून शांताबाई गणेश मांडवकर (वय 35) हिच्या आईला 10 हजार रुपये उसनवारीने दिलेले  होते.हे पैसे परत मागून घेण्यावरुन 9 मे 2015 रोजी मांडवकर याने शांताबाईला वीट मारुन फेकली, त्यांनतर विळा व कु:हाडीने तिच्यावर हल्ला केला.
यात गंभीर जखमी झालेल्या शांताबाईचा उपचार सुरु असताना 10 मे 2015 रोजी औरंगाबाद येथे  मृत्यू झाला होता. सुनेवर हल्ला केल्यानंतर काळू मांडवकर हा  स्वत:च हातात कु:हाड घेवून पाळधी पोलीस दूरक्षेत्राला गेला होता.  प्रारंभी 307 व नंतर कलम वाढवून 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला  होता.

न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात कलम 164 चा जबाब नोंदवून घेणारे एरंडोलचे प्रथम न्यायदंडाधिकारी दत्तात्रय वामणे,  तपासाधिकारी देविदास ढुमणे,वैद्यकिय अधिकारी यांच्यासह 13 जणांच्या साक्षी झाल्या होत्या. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे य™ोश पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Mother's murder case: Mother's life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.