शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मातृदिन विशेष- कोरोना महामारीत ‘आशा’  झाल्या  ‘आई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 12:37 AM

कठीण स्थितीतही ग्रामीण भागात कोरोना फ्रंटलाईनर म्हणून उभ्या राहिल्या त्या आशा स्वयंसेविका. वाडी - वस्तीतील प्रत्येक कुटूंबासाठी जणू त्यांनी आईची भूमिका निभावली आहे.

ठळक मुद्देवाडी-वस्तीत कुटुंबांसाठी पायपीटकोविड फ्रंटलाईनर म्हणून करताय काम

चाळीसगाव  : कोरोनाचे रुप इतके कराल आहे की, त्याने नात्यांच्या घट्ट साखळ्या तोडून टाकल्या. रक्ताने जोडलेली नाळही खंडीत झाली. ग्रामीण व शहरी भागातील 'आशा' स्वयंसेविका मात्र कोरोना फायटर होत आईच्या मायेनं जनतेची काळजी घेत आहे. कोरोनाच्या महामारीत त्यांच्यातील 'आई'चे रुप खरोखरच प्रकर्षाने समोर आले आहे. स्वतःची पर्वा न करता त्या वाडी - वस्त्यांमध्ये आरोग्याचा जागर करीत जणू  या कुटुंबीयांची आईच बनल्या आहेत.  

वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोनाने जगाचे रहाटगाडे थांबविले. जणू क्षणभर काळाचीही पावले थांबून रहावे, असे हे आक्राळ - विक्राळ संकट. यासंकटाने नात्यांची घट्ट वीण उसवली. आई - लेकराची ताटातूट केली. हट्टेकट्टे तरुणही गिळले. नागरिक घरात कोंडले गेले. बाहेर पडणारं पाऊल मृत्युचे कारण ठरु लागले. मात्र याच वणव्यात आरोग्य यंत्रणा पाय रोवून उभी राहिली. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा 'सलाईनवर' असल्याचे वास्तव वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. अशा कठीण स्थितीतही ग्रामीण भागात कोरोना फ्रंटलाईनर म्हणून उभ्या राहिल्या त्या आशा स्वयंसेविका. वाडी - वस्तीतील प्रत्येक कुटूंबासाठी जणू त्यांनी आईची भूमिका निभावली आहे.

गेल्यावर्षी शिवनेरीकडून 'भाऊबीज' भेटगेल्या वर्षी  आमदार मंगेश चव्हाण प्रेरीत शिवनेरी फाऊंडेशनने याआशांची 'आई - बहिण' अशा दोघाही रुपांची पूजा केली. दिवाळीच्या पर्वावर एका जाहिर सोहळ्यात 'आशां'ना माहेरची भाऊबीज भेट देऊन गौरविले. समाजातील १३०० हून अधिक गरजू भगिनींना फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी 'साडी - चोळी' देऊन त्यांचे एकप्रकारे माहेरपण साजरे केले होते. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना नवी उभारीच मिळाली.

मानधन अल्प, कामाचा व्याप मोठाकोरोनाकाळात गावोगावच्या 'आशां'नी गरोदर मातांसह स्तनदा मातांची काळजी घेतली. नवजात बालकांच्या अत्यावश्यक लसीकरणाचा टप्पा सांभाळला. एवढचं नाही तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीत घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले. आजारी नागरिकांना धीर दिला. शासकीय योजनांची माहितीही घरोघरी पोहचवली. मे हीटच्या रणरणत्या उन्हात देखील त्यांची पायपीट थांबलेली नाही. चाळीसगाव शहर व तालुक्यात ३२५ आशा स्वयंसेविका आहे. त्यांना ठराविक पगार नाही. जेवढे काम कराल. तेवढेच मानधन मिळते. अर्थात कामाचा व्याप मोठा आणि मानधन तोडके. मात्र तरीही त्यांच्यातील 'आई'ची माया आटलेली नाही, हे विशेष.

लसीकरणाच्या ब्रॕड अॕम्बेसिंडरकोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी ग्रामीण भागात मोठे समज - गैरसमज आहे. विशेषतः वयस्कर मंडळी लस घेण्यासाठी फारशी धजावत नाही. कधीही इंजेक्शन टोचून न घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी तयार करणे तसे अवघडच. तथापि हार मानतील त्या 'आशा' कश्या. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील लसीकरणचा आकडा वाढतोयं. त्याच्या मुळाशी आशा स्वयंसेविकांची झोकून देणारी मेहनत आहे. ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्याही 'आशा' ब्रॕड अॕम्बेसिडर ठरत आहे.

 कोरोनातील मृत्युची भीती झुगारुन आम्ही काम करतोयं. ग्रामीण भागात काम करतांना अडचणी येतात. मात्र यावर मात करीत महामारीतील हे युद्धच लढतोयं. नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. गेल्यावर्षी आमच्या कष्टाची जाणीव ठेऊन शिवनेरी फाऊंडेशनने पाठीवर हात ठेवला होता. लोंढे प्राथ.आरोग्य केंद्रातील डॉ. संदीप निकम, आरोग्य सेविका यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते आहे. ग्रामपंचायतीचेही सहकार्य मिळत आहे. कधी आई तर कधी बहिण होऊन गावातील कुटूंबाची काळजी घेत आहे.- रेखा पांडुरंग तिरमलीआशा स्वयंसेविका तिरपोळे, ता. चाळीसगाव. 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेChalisgaonचाळीसगाव