सुनेच्या निधनाच्या दु : खाने सासूचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:06 IST2020-10-11T17:05:48+5:302020-10-11T17:06:36+5:30

साकेगाव : एकाच वेळी दोघींवर अंतिम संस्कार

Mother-in-law dies in grief over Sune's death | सुनेच्या निधनाच्या दु : खाने सासूचा मृत्यु

सुनेच्या निधनाच्या दु : खाने सासूचा मृत्यु


भुसावळ: शहराजवळील साकेगाव येथे सुनेच्या विरहाने सासूचा मृत्यू झाला. या दु:खद घटनेने सासु -सुने तील प्रेमळ संबंधाचा दुर्मीळ संदेश समाजाला मिळाला आहे.
वृत्त असे की, रंजनाबाई सुरेश मनोरे (४८) यांना पोटातील त्रासामुळे पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होत.े या शस्त्रक्रियेदरम्यान रंजनाबाई यांचा १० आॅक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दुदेर्वी मृत्यू झाला. हा संदेश लगेचच सासुबाई मिराबाई गोविंदा मनोरे (६५) यांना समजल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली व सुनबाईच्या अकाली निधनाचे दु:ख सहन न झाल्यामुळे ११ च्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास मिराबाई यांना हृदय विकाराचा त्रीव झटका आला व यातच त्यांचा मृत्यू झाला.
रविवारी पुणे येथून सुनबाई मिराबाई यांचा मृत्यूदेह गावात आणल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सासू-सुनेच्या मृत्यूदेहावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आला.
 

Web Title: Mother-in-law dies in grief over Sune's death