पूत्रविरहात आईचेही निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:21 IST2017-03-15T00:21:38+5:302017-03-15T00:21:38+5:30
सावदा : सरोदे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

पूत्रविरहात आईचेही निधन
सावदा : शहरातील शेतकरी प्रमोद सरोदे यांनी आत्महत्या केल्यानंतर पूत्र विरहात त्यांच्या मातोश्री उषाबाई वासुदेव सरोदे (वय 84) यांचेही 13 रोजी सकाळी निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आह़े शेतीतील नुकसान, कजर्बाजारीपणा, व्यवसायातील मंदी आदी कारणांनी प्रमोद सरोदे यांनी 11 रोजी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती़ त्यांचे अस्थिंचे विसजर्न होत नाही तोच पूत्र विरहात त्यांच्या आईचेही निधन झाल़े
मातृछत्र हरपल्याने प्रमोदचा मुलगा पुष्कर व पत्नी नीलिमा, मुलगी सोनाली आदी सरोदे कुटुंबियांना दु:खाला सामोरे जावे लागल़े