शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 18:10 IST

मुलीच्या लग्नाच्या दिवशीच मुलीच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव येथील सितामाई नगरात घडली

ठळक मुद्देचाळीसगावातील दुर्देवी घटना : सितामाई नगरातील भोकरे परिरावर शोककळा

चाळीसगाव : घरात मुलीचा विवाह असल्याने आनंदाचे वातावरण होते. तथापि आईच्या मृत्यूचा दुर्दैवी प्रसंग मंगळवारी सितामाई नगरातील भोकरे परिवारावर कोसळला. काळजावर दुःखाचा दगड ठेवत परिवाराने हा सोहळा साध्या पद्धतीने पार पाडला. या घटनेमुळे सितामाई नगरासह वाणी समाजात हळहळ व्यक्त होत आहे. मुलीचे हात पिवळे होणे. ही कोणत्याही आईसाठी आनंददायी स्वप्नपूर्ती असते. मांगल्याचे हे क्षण अनुभवणे हा जीवनाचा सार्थकी सोहळाच असतो. तथापि, सोहळा पाहण्याआधीच संगीता राजेंद्र भोकरे (५०, कोठावदे) यांना मृत्यूने गाठले. मंगळवारी मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईची प्राणज्योत विझली. संगीता राजेंद्र कोठावदे या प्राथमिक शिक्षिका म्हणून तरवाडे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेंद्र भोकरे हे उमरखेड, ता. भडगाव येथे  जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांची मोठी मुलगी मयुरी हिचा विवाह मंगळवारी लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात सायंकाळी मुहूर्तावर पार पडणार होता. मात्र संगीता यांची प्रकृती खालावल्याने विवाह दुपारीच उरकण्यात आला. त्यांच्या पश्चात सासू, पती आणि बारावीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे.डोळे पाणावलेले, हुंदका आणि मंगलाष्टकेसंगीता भोकरे या गत सहा महिन्यापासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांना स्वादूपिंडाचा कर्करोग होता. उपचारही सुरुच होते. मुलीचा विवाह सोहळा असल्याने घरात मंगलमय वातावरण होते. मंगळवारी सकाळीच संगीता यांची प्रकृती खालावली. सव्वा दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह घरात ठेवत आणि दुःखाचा डोंगर पेलत भोकरे परिवाराने मुलीचा विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. दुपारी साडेबारा वाजता साध्या पद्धतीने मयुरी व नीलेश अमृतकार यांचा विवाह झाला. सायंकाळी साडे सहा वाजता संगीता यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावmarriageलग्न