शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

हद्दीच्या वादात मुलाच्या मृतदेहाजवळ सहा तास रडली आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 22:47 IST

रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू : शौचास गेला होता

जळगाव : शौचास गेलेल्या गजानन दलपत पाटील (२६, रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने रविवारी रात्री मृत्यू झाला, मात्र ही घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांच्या हद्दीच्या वादात मृतदेहाजवळ सहा तास पोलीस घटनास्थळी पोहचले नाही, तितका वेळ आई मुलाजवळ रडतच बसली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन पाटील हा तरुण हातमजुरी करुन त्याचा व आई रुख्मीणीबाईचा उदनिर्वाह चालत होता. गेल्या वर्षीच गजाननच्या वडीलांचे अकाली निधन झाले असल्याने घरात दोन्ही माय-लेक इतकाच परिवार होता. दोन वेळच्या जेवणा पुरते दिवसभर मिळेल ते काम करायचे आणि जगायचे अशा चौकटीत गजानन तो जगत होता. रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शौचास जातो म्हणुन आईला सांगून गजानन घरा समोरच रेल्वेरुळाच्या बाजुला गेला होता. रात्री घरी परतला नाही म्हणुन आई वाट पाहत होती. सकाळी घराजवळील रेल्वेरुळाजवळ मृतदेह पडल्याचे आढळून आल्याने नागरीकांनी धाव घेतली. मृतदेह गजाननचा असल्याचे ओळख पटल्यावर पोलिसांना घटना कळवण्यात आली. मात्र लोहमार्ग, तालुका व रामानंद नगर अशा तीन ठिकाणच्या पोलिसांमध्ये हद्दीचा वाद निर्माण झाला, त्यामुळे दुपारी अडीच वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरच पडून होता. शेवटी रामानंद नगर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव