महागाईने ओतले आणखी तेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:24+5:302021-09-06T04:20:24+5:30
जगावे कसे? दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. घरातील खर्चाचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत होत आहे. पूर्वी ...

महागाईने ओतले आणखी तेल
जगावे कसे?
दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. घरातील खर्चाचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत होत आहे. पूर्वी दर महिन्याला अडीच हजार रुपयांपर्यंत लागणाऱ्या किराणाचा खर्च आता जवळपास चार हजारांपर्यंत पोहोचला आहे.
- प्रमिला जगताप, गृहिणी
घरात दररोज लागणाऱ्या खाद्य तेलाचे भाव कधी नव्हे एवढे वाढले आहेत. शिवाय डाळी, धान्य तसेच सर्वच घटकांचे भाव चांगलेच कडाडल्याने किचनचे बजेट आवाक्याबाहेर जात आहे. त्यात गॅस सिलिंडरचा दर प्रत्येक महिन्याला चिंता वाढवत आहे.
- लक्ष्मी मराठे, गृहिणी.
ताळमेळ कसा घालावा?
कोरोनाचा संसर्ग पसरला तेव्हापासून एक तर पगारात कपात झाली. त्यात दवाखान्याचा खर्च सांभाळत असताना महागाईदेखील आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या पगारात घर कसे चालवावे, असा प्रश्न दर महिन्यालाच पडतो.
- दिलीप बारी, मध्यमवर्गीय नागरिक.
भाडे वाढले, काय करणार
मालवाहतुकीचे दर वाढल्याने सर्वत्र सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. उत्पादन ठिकाणापासून होलसेल व्यापाऱ्यापर्यंत वाढीव भावाने माल येतो व किरकोळ विक्रेत्यांकडेदेखील वाढलेले दर मोजावे लागतात. इंधन दर वाढीने सर्वच वस्तूंचे भाव वाढत आहेत.
- सचिन क्षीरसागर, किराणा व्यावसायिक.