मुडी येथे जि. प. शाळेच्या नवीन खोलीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:22+5:302021-09-03T04:18:22+5:30
अमळनेर : जिल्हा परिषदअंतर्गत मुडी-मांडळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता भिल यांच्या निधीतून मुडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक ...

मुडी येथे जि. प. शाळेच्या नवीन खोलीचे भूमिपूजन
अमळनेर : जिल्हा परिषदअंतर्गत मुडी-मांडळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता भिल यांच्या निधीतून मुडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन खोलीचे भूमिपूजन माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या संगीता भिल, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व्ही. आर. पाटील, संदीप पाटील, बाजार समिती संचालक पावभा पाटील, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी सरपंच संजय पाटील, मुडी सरपंच काशिनाथ माळी, बोदर्डे सरपंच प्रवीण संदानशिव, मुडी उपसरपंच भानुदास पाटील , नारायण पाटील, संजय पाटील, हर्षल पाटील, शांताराम पाटील, वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील, संजय भिल, गुलाबराव पाटील, ग्रा.पं. सदस्य योगेश सोनवणे, नाना चौधरी, संतोष चौधरी, एकलव्य तालुका अध्यक्ष शाना भिल, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विवेक पाटील, विलास सूर्यवंशी, अमृत पाटील, बापू बडगुजर, बापू काटे, विकास पाटील, मुडी ग्रामसेवक ईश्वर पाटील, मुख्याध्यापक आर. के. पाटील, तीन पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.