ज्ञानदा कदम यांचे सोमवारी व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST2021-07-03T04:12:12+5:302021-07-03T04:12:12+5:30

जळगाव : मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या राज्यव्यापी संघटनेतर्फे वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या व्याख्यानाचे सोमवारी आयोजन करण्यात ...

Monday lecture by Dnyanada Kadam | ज्ञानदा कदम यांचे सोमवारी व्याख्यान

ज्ञानदा कदम यांचे सोमवारी व्याख्यान

जळगाव : मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या राज्यव्यापी संघटनेतर्फे वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या व्याख्यानाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. काय सांगशील ज्ञानदा – महिला आणि प्रसार माध्यमे असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. दुपारी बारा वाजता ऑनलाईन स्वरुपात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. सुधीर भटकर यांनी दिली.

या उपक्रमात चांगले प्रश्न विचारणाऱ्या दोन विद्यार्थिनीना ज्ञानदा कदम यांच्या वतीने पारितोषिके दिली जाणार आहेत. माध्यम शिक्षक व माध्यम विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम)चे अध्यक्ष डॉ. सुधीर भटकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर, उपाध्यक्ष डॉ. सुंदर राजदीप यांच्यासह संघटनेचे सचिव डॉ. विनोद निताळे, सहसचिव डॉ. शाहेद शेख, कोषाध्यक्ष डॉ. रोहित कसबे, कार्यकारिणी सदस्य डॉ. कुमार बोबडे, डॉ. मोईज हक, डॉ. संजय तांबट, डॉ. मंजुला श्रीनिवास, डॉ. मीरा देसाई, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुहास पाठक यांनी केले आहे.

Web Title: Monday lecture by Dnyanada Kadam