मुंदाणे प्र .अ. येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:20 IST2019-04-16T14:19:48+5:302019-04-16T14:20:26+5:30

नाचण्याच्या कारणावरुन झाला वाद

Mon. Two gang rioters, one seriously injured | मुंदाणे प्र .अ. येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, एक गंभीर जखमी

मुंदाणे प्र .अ. येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, एक गंभीर जखमी


पारोळा - तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथे दोन गटात नाचण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी होऊन त्यात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ रोजी सकाळी सात वाजता घडली.
नाचण्याच्या कारणावरून दिलीप नथ्थु बागुल यांना व त्यांचा मुलगा विकास बागुल यास मुरलीधर पुंडलिक संदांनशीव, सागर मुरलीधर संदांनशीव, आंबादास नाना संदांनशीव, प्रवीण गोरख संदांनशीव सर्व रा. मुंदाने यांनी दगडफेक करून मारहाण केली. यात विकास बागुल यांच्या डोक्यावर दगड लागल्याने त्यात तो गंभीर जखमी होऊन त्यास धुळे येथे हलविण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील काही जण जखमी झाले आहेत. याबाबत दिलीप नथ्थु बागुल यांनी पारोळा पो. स्टे. ला फिर्याद दिल्यावरून संदानशीव परिवारावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे आशिष चौधरी हे करीत आहेत.

Web Title: Mon. Two gang rioters, one seriously injured