विनयभंग करून महिलेला मारहाण, तरुणीचा पाठलाग करून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 21:12 IST2019-07-22T21:12:28+5:302019-07-22T21:12:37+5:30
अमळनेर : तालुक्यात जवखेडा येथे एका महिलेचा विनयभंग करून आठ जणांनी तिला मारहाण केली. तर शहरात एका अल्पवयीन तरुणीचा ...

विनयभंग करून महिलेला मारहाण, तरुणीचा पाठलाग करून विनयभंग
अमळनेर : तालुक्यात जवखेडा येथे एका महिलेचा विनयभंग करून आठ जणांनी तिला मारहाण केली. तर शहरात एका अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून एका तरुणाने तिचा विनयभंग केल्याची दुसरी घटना घडली.
जवखेडा येथे १४ जून रोजी मुरूम टाकण्याच्या कारणावरून एका महिलेचा हात धरून राजेंद्र आंनदा पाटील व लक्ष्मण आंनदा पाटील यांनी विनयभंग केला. त्याच वेळी भाऊसाहेब आनंदा पाटील, नरेंद्र लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील, योगेश राजेंद्र पाटील, भिकू लक्ष्मण पाटील, सुशमा भाऊसाहेब पाटील यांनी शिवीगाळ करून चापटांनी मारहाण केली. याबाबत २२ जुलै रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुभाष महाजन करीत आहेत. दुस-या घटनेत ढेकू रोडवरील एका १७ वर्षीय महिलेचा गांधलीपुरा भागातील समीर शेख याने २१ जुलै रोजी दुपारी एका शाळेजवळ पाठलाग करून विनयभंग केला. याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक नाही. तपास सपोनि. प्रकाश सदगीर करीत आहेत.