शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

विनयभंग, आत्महत्येच्या घटनेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:30 PM

महिलांवरील अत्याचार

ठळक मुद्देकौटुंबिक छळाच्या घटनांवर मिळविले नियंत्रण

सुनील पाटील ।जळगाव : महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत २०१७ च्या वर्षाच्या तुलनेत २०१८ मध्ये वाढ झाली आहे. नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंड्यासाठी गांजपाट व छळाच्या गुन्ह्यात मात्र वाढ झाली आहे. दाखल गुन्ह्यांची तुलना केली असता काही प्रकारात वाढ तर काही प्रकारात घट आहे, मात्र असे प्रकरणे आहेत की बदनामीपोटी त्याची पोलीस दप्तरी नोंद होत नाही. कौटुंबिक छळाच्या घटना रोखण्यात मात्र महिला सहाय्य कक्षाला यश आले आहे.असे आहे गुन्ह्यांचे प्रमाण२०१७ व २०१८ या दोन्ही वर्षात बलात्काच्या घटनांचा आकडा सारखाच आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात मात्र ६६ ने वाढ झालेली आहे. हुंड्यासाठी विवाहितेला मारल्याचे २०१७ मध्ये जिल्ह्यात ५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१८ मध्ये मात्र एकही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे त्यात घट झालेली आहे. हुंड्यासाठी छळ होण्याच्या आकडेवारीतही घट झालेली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटनेत मात्र कमालीची वाढ झालेली आहे. २०१६ मध्ये महिला व अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे ६३ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ मध्ये ६६ गुन्हे दाखल होते. विनयभंगाचे सर्वाधिक २७१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याआधीच्या वर्षात २०१५ मध्ये हा आकडा २७७ चा होता.महिला सहाय्य कक्ष ठरतोय आधारमहिलांच्या तक्रारी, अन्याय व अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्ष आधार ठरत आहेत. थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या कक्षात दररोज अनेक प्रकरणांमध्ये तडजोडी होतात. २०१८ या वर्षभरात या कक्षाकडे महिलांच्या १ हजार २२ तक्रारी प्राप्त झाल्या.त्यातील १८४ कुटुंबात समजोता करण्यात या कक्षाला यश आले आहे. २०७ प्रकरणात मात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांवर अद्यापही कामकाज सुरु आहे. १७७ कुटुंब थेट न्यायालयात गेले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या अख्त्यारित असलेल्या या विभागाचे कामकाज पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीता कायटे, सहायक फौजदार सुमन कोलते, अन्नपूर्णा बनसोडे, हे.कॉ.शैला धनगर, वंदना आंबिकर, सविता परदेशी व वैशाली पाटील आदी सांभाळत आहेत. या पथकाकडून दररोज पती-पत्नीचे समुपदेशन केले जाते.महिला सहाय्य कक्ष ठरतोय आधारमहिलांच्या तक्रारी, अन्याय व अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्ष आधार ठरत आहेत. थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या कक्षात दररोज अनेक प्रकरणांमध्ये तडजोडी होतात. २०१८ या वर्षभरात या कक्षाकडे महिलांच्या १ हजार २२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १८४ कुटुंबात समजोता करण्यात या कक्षाला यश आले आहे. २०७ प्रकरणात मात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.काही प्रकरणांचे कामकाज सुरूउर्वरित प्रकरणांवर अद्यापही कामकाज सुरु आहे. १७७ कुटुंब थेट न्यायालयात गेले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या अख्त्यारित असलेल्या या विभागाचे कामकाज पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीता कायटे, सहायक फौजदार सुमन कोलते, अन्नपूर्णा बनसोडे, हे.कॉ.शैला धनगर, वंदना आंबिकर, सविता परदेशी व वैशाली पाटील आदी सांभाळत आहेत. या पथकाकडून दररोज पती-पत्नीचे समुपदेशन केले जाते.निर्भया व पोलिसांची गस्त यामुळे छेडखानीच्या घटना निम्यावर आल्या आहेत. २०१५ मध्ये १६ गुन्हे दाखल झाले होते. हुंड्यासाठी छळ, गांजपाट या प्रकारात तब्बल २९९ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २३ ने वाढ झाली आहे.२०१५ मध्ये २७६ गुन्हे दाखल होते. नवविवाहितांचा छळ करुन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करायला लावल्याच्या २९ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. तर हुंड्यासाठी छळ (कलम ३०४ ब) झाल्याचे २ गुन्हे दाखल आहेत.