लोण पिराचे येथे मोहरम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:36+5:302021-08-22T04:19:36+5:30

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या लोण पिराचे येथे यावर्षीदेखील मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. लोण पिराचे ...

Moharram excitement at Lon Pirache | लोण पिराचे येथे मोहरम उत्साहात

लोण पिराचे येथे मोहरम उत्साहात

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या लोण पिराचे येथे यावर्षीदेखील मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

लोण पिराचे येथे पीर गैबनशाह बाबाची दर्गाह आहे. येथे दरवर्षी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात व सर्व समाजबांधव मिळून मोहरम हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. परिसरासह जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. मात्र दोन वर्षांपासून कोविड प्रादुर्भाव असल्याने यावर्षीदेखील मोहरम शासनाच्या नियमाचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने पण उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच विजय पाटील, सुरेश खैरे, प्रताप पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कैलाश पाटील, परशुराम पाटील, फिरोज पिंजारी, हारून खाटीक व लोणकरांचे सहकार्य लाभते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरबत व जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

210821\21jal_8_21082021_12.jpg

लोण पिराचे येथील पीर गैबनशाह बाबाच्या दर्ग्यावर दर्शनार्थ आलेले भाविक.

Web Title: Moharram excitement at Lon Pirache