मोहाडीच्या महिला रुग्णालयाला पहावी लागणार वर्षभराची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:14 PM2020-08-11T13:14:36+5:302020-08-11T13:14:44+5:30

काम संथगतीने : शंभरावर असलेली कामगार संख्या आली पंधरावर

Mohadi's women's hospital will have to wait for a year | मोहाडीच्या महिला रुग्णालयाला पहावी लागणार वर्षभराची वाट

मोहाडीच्या महिला रुग्णालयाला पहावी लागणार वर्षभराची वाट

googlenewsNext

जळगाव : मोहाडी शिवारातील महिला रुग्णालयाचे काम मुदत संपून वाढीव मुदत घेऊनही निधीअभावी अत्यंत संथ गतीने सुरू असून सुरूवातील शंभर मजुरांपासून सुरू झालेल्या या कामावर सध्यास्थितीत केवळ पंधरा ते वीस मजूर येत असल्याची माहिती आहे़ सोमवारी या कामाची पाहणी केली असता सुटी असल्याने काम बंद होते़ मात्र, काम कधी बंद कधी सुरू असेचे चित्र असल्याची माहिती काही मिळाली़ फेब्रुवारी २०२० पर्यंत बांधकामाची मुदत होती़
महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय व्हावे यासाठी मोहाडी शिवारात प्रशस्त असे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले़ यात २०१८ पासून कामाला सुरूवात करण्यात आली़ दोन महिने काम पूर्ण करण्याची मुदत होती़ सुरूवातीला वेगाने काम सुरू झाले़ मात्र, कामाची गती संथ होत गेली व दोन वर्ष पाच महिन्यांचा काळ होऊनही अद्यापही रुग्णालयाचे काम बऱ्याच अंशी बाकी असल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समोर आले़ आणखी किमान वर्षभर हे काम चालेले व पैसे नसले तर त्याहीपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो, अशीही माहिती समोर आली़ दोन दिवस सुटी असल्याने सोमवारी कोणी नसल्याचे काही कामगारांनी सांगितले़

काम बंदच : काय होते चित्र?
ए, बी, सी, ई अशा चार विंग असून यातील सी विंगचे रंगकाम, फरशा, फिर्निशिंग असे सर्व काम बाकी आहे़ ए विंगचेही बºयापैकी काम बाकी आहे़ बी व ई विंगचे काम बºयापैकी झाले आहे़ त्यातही काही अंशी फिनिशिंगचे काम अपूर्ण आहे़ पाहणी केल्यानंतर काम बंदच होते़ साहित्य बाहेर पडलेले होते़ केवळ तीनच मजूर कामावर होते़ निधी कमी पडत गेल्यानंतर मजूरांची संख्या घटत गेली़ आधी मोठ्या प्रमाणावर संख्या होती़ ती घटून पंधरा ते वीसवर आली़ लॉकडाऊनमध्ये तर बंदच्या बरोबर होते़ ऐवढ्या मजुरांवर काम करायचे म्हटल्यास वर्षभर तरी अवधी लागेल, अशी माहिती मिळाली़

काही विंगची कामे ९० टक्के झाली आहेत़ एका विंगचे काम ८० टक्के झाले आहे़ निधी मिळाल्यास आगामी दोन महिन्यातच सर्व काम पूर्ण होईल़
- सुभाष राऊत, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग

-काम सुरू झाले : १६ फेबु्रवारी २०१८
-मुदत : फेब्रवारी २०२०
-वाढीव मुदत :फेब्रुवारी २०२१
-मोहाडी शिवारात प्रशस्त असे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याचे नियोजन.
 

Web Title: Mohadi's women's hospital will have to wait for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.