देशाला ताट वाजायला लावून मोदींनी देशात औदसा आणली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:24+5:302021-06-24T04:13:24+5:30
लोकमत न्यूज नेटर्क जळगाव : एकीकडे देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ताट ...

देशाला ताट वाजायला लावून मोदींनी देशात औदसा आणली
लोकमत न्यूज नेटर्क
जळगाव : एकीकडे देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ताट वाजायला लावले, दिवे लावायला लावले, दिवे लावून, ताट वाजवून जर कोरोना नष्ट झाला असता तर देशाला रुग्णालयांची गरजच राहिली नसती. देशाला ताट वाजायला लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाची औदसा आणल्याची घणाघाणी टीका कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी कॉग्रेसच्या कोविड योध्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पटोले बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, राज्याचे प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष , माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, माजी प्रदेश सचिव डी.जी.पाटील, जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, शहर प्रभारी अश्विनी बोरस्ते यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांची सेवा करणाऱ्या कॉग्रेसच्या व वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योध्यांचा यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोनाचे संकट हे जागतिक षडयंत्र
देशात कोरोनाचे संकट हे मानव निर्मित असून, हे जागतिक षडयंत्र असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. तसेच नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाबलीपूरम येथे बैठक झाल्यानंतरच जगात कोरोनाचा प्रसार झाला असल्याचाही दावा पटोले यांनी केला.
तेल महाग करण्यामागे अडाणीचा फायदा करण्याचा डाव
सध्या खाद्यतेलाचे भाव वाढत असून, तेलाचे भाव वाढविण्यामागे अडाणी यांचा फायदा करण्याचा डाव केंद्र शासनाचा असल्याचा आरोप पटोले यांनी केला. देशातील नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे नरेंद्र मोदी हे जागातील पहिलेच पंतप्रधान असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. आता देशाच्या जुलमी शासनाविरोधात लढण्याचे काम कॉग्रेसच्या योध्यांनी करावे असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नाही, तर यमदुत - प्रणीती शिंदे
देशात कोरोना आणून संपुर्ण देशाला लॉकडाऊन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ मजा केली. देशाच्या जनतेला मात्र मृत्यूचा दाढेत टाकले. कॉग्रेसचे कार्यकर्ते हे कोरोनाकाळात नागरिकांना मदत करून, देवदुतासारखे काम करत असताना मोदी यांनी यमदुत बनून देशातील नागरिकांना मरण्यासाठी सोडून दिल्याची जोरदार टीका महाराष्ट्र कॉग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी केली. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी प्रास्ताविक केले.
काळ्या कृषी कायद्याची केली होळी
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी लागू केलेल्या कृषी कायद्याचे प्रतिकात्मक होळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आली. कृषी कायद्याची होळी करून, भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.