मोबाईल अपडेट केला आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:42+5:302021-08-24T04:20:42+5:30

मोबाइल अपडेट केला आहे का? वाहन खरेदी करताना व नोंदणी करताना मोबाइल नंबर दिला जातो. हा नंबर दिला असेल ...

Mobile updated? | मोबाईल अपडेट केला आहे का?

मोबाईल अपडेट केला आहे का?

मोबाइल अपडेट केला आहे का?

वाहन खरेदी करताना व नोंदणी करताना मोबाइल नंबर दिला जातो. हा नंबर दिला असेल तर त्यावर ई-चलनबाबत संदेश प्राप्त होतो. नोंदणीच्यावेळचा मोबाइल नंबर बदलला असेल तर संदेश येत नाही. त्यासाठी वाहन प्रणालीत मोबाइल क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे. आरटीओ कार्यालयातून हा नंबर अपडेट करता येतो, आता वाहन नोंदणीचे अधिकार वितरकांना आहेत. त्यांच्याकडे फक्त नवीन वाहन खरेदी करतानाच नंबर देता येऊ शकतो.

दंडाची थकबाकी वाढली

सन २०१९ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ८ कोटी ७ लाख ६० हजार ८०० रुपये इतका दंड वाहनधारकांना आकारण्यात आलेला आहे. त्यापैकी १ कोटी २५ लाख ९४ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल झालेला आहे. ६ कोटी ८१ लाख ६६ हजार ५०० रुपये दंड थकीत आहे. यात अनेक वाहनधारकांचे राहण्याचे पत्ते बदल झाले आहे तर काहींचे मोबाइल क्रमांक बदल झालेले आहेत. त्यामुळे या वाहनधारकांपर्यंत दंडाची माहितीच पोहचलेली नाही. ज्यांना पोहचली, त्यांच्यापैकी अनेकांनी दंड भरायला टाळाटाळ केलेली आहे, त्यामुळे थकबाकी वाढत चालली आहे. ही वसुली करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आधी वाहनावर यापूर्वी काही दंड आहे का? याची पडताळणी केली जात आहे. मागील दंड भरल्याशिवाय वाहनच सोडले जात नाही.

कोट...

थकीत दंड वसुलीसाठी मोहीम उघडण्यात आलेली आहे. वाहन तपासणी करताना सर्वात आधी त्या वाहनावरील पूर्वीचा दंड तपासला जात आहे. दंड असेल तर जागेवरच दंड वसूल केला जातो, अन्यथा वाहन जप्त केले जात आहे. शहरात कारवाईचा आकडा मोठा असल्याने साहजिकच दंडाचाही आकडा मोठा दिसतो. अनेक वाहन मालक नो पार्किगमध्ये वाहन पार्किंग करून कामाला निघून जातात. ते येईपर्यंत वाहनाजवळ थांबणे शक्य नाही, म्हणून ई-चलन तयार केले जाते.

-देवीदास कुनगर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

वर्ष झालेला दंड वसूल

२०१९ ८७,५६,७५० ४८,९८,८५०

२०२० २,६१,५९,९५० ९६,०७,३५०

२०२१ ४,५८,४४,१०० ७८,८१,०००

ऑगस्टपर्यंत

Web Title: Mobile updated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.