मोबाईल चोरटा अडकला जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:05 IST2020-08-11T15:04:56+5:302020-08-11T15:05:02+5:30
भुसावळ रेल्वे पोलिसांची कामगिरी

मोबाईल चोरटा अडकला जाळ्यात
भुसावळ : धावत्या गाडयांमध्ये तसेच स्थानकावर येण्यापूर्वी हातावर हल्ला करून मोबाईल लांबविणाऱ्या शेगावच्या चोरास भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आऊटरवर गाडी स्लो झाल्यानंतर प्रवाशांच्या हातावरदणकट वस्तूने हल्ला करून मोबाईल लांबविणाºया या आरोपीचे नाव राहुल तायडे (२३, शेगाव) असे आहे.
तक्रारदार निलेश जगन्नाथ वाणी (जळगाव) हे २० मार्च रोजी पठाणकोट एक्स्प्रेसने खंडवा ते जळगाव प्रवास करीत असताना भुसावळ आल्यानंतर आऊटरवर गाडीचा वेग कमी होताच आरोपीने वाणी यांच्या हातावर लोखंडी रॉडने हल्ला करून ५८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या
मार्गदर्शनाखाली एएसआय मधुकर न्हावकर, नितीनपाटील, जयकुमार कोळी, सिद्धेश्वर देशमाने आदींनी गोपनीयमाहितीवरून अप कामायनी एक्स्प्रेसमधून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तपास एएसआय भरत शिरसाठ करीत आहेत.