शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

जळगावात पोलीस ठाण्यातूनच मोबाईलचोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:19 PM

जिल्हापेठ ठाण्यात दाखल होता गुन्हा : मोबाईलसह घेतले होते ताब्यात

ठळक मुद्दे 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होतागुन्ह्याची कबूल देत त्याने चोरीचा महागडा मोबाईल काढून दिला होता़शोधण्यासाठी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी कामाला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मोहन प्रकाश भारुडे (वय-19़ रा़कोळीपेठ) याला शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळी मोबाईलसह अटक केली़ सकाळी अटक केलेला हा आरोपी सायंकाळी पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली़ दरम्यान याबाबत पोलीस निरिक्षक प्रविण वाडीले यांनी 41 कलमान्वये त्याला अटक करण्यात आली होती, त्यात असलेल्या अधिकारान्वये त्याला सोडून दिल्याचे सांगितल़े जामनेर शहरातील इंद्र ललवाणी नगरातील रहिवासी शुभम संजू पाटील (वय-20) हा खाजगी कामासाठी 4 ऑगस्ट रोजी जळगावात आला होता़ काम आटोपून पुन्हा जामनेर जाण्यासाठी दुपारी 12़40 वाजता नवीन बसस्थानकावर आला़ याठिकाणी जामनेर बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटय़ाने शुभमच्या पॅन्टच्या खिशातून 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी 8 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक प्रविण वाडीले यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मोबाईल चोर मोहन भारुडे हा कोळीपेठेत त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचा:यांनी त्याला ताब्यात घेतल़े गुन्ह्याची कबूल देत त्याने चोरीचा महागडा मोबाईल काढून दिला होता़ जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती़ मात्र त्यापूर्वी भारुडे हा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला़ त्याला शोधण्यासाठी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी कामाला होत़े