बाहेती महाविद्यालयात मोबाईल बंदी

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:09+5:302015-12-05T09:07:09+5:30

जळगाव : अॅड.सीताराम बाहेती महाविद्यालयातील बारावीतील एका विद्यार्थिनीने गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Mobile ban at BAHATI college | बाहेती महाविद्यालयात मोबाईल बंदी

बाहेती महाविद्यालयात मोबाईल बंदी

जळगाव : अॅड.सीताराम बाहेती महाविद्यालयातील बारावीतील एका विद्यार्थिनीने गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर महाविद्यालयीन व्यवस्थापनाने शुक्रवारी तातडीने बैठक घेतली व महाविद्यालयात शनिवारपासून मोबाईललाही बंदी घालण्याचे आदेश प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी काढले आहेत.

मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर

महाविद्यालयात प्रवेश असलेल्या अनेक विद्याथ्र्याजवळ मोबाईल संच आहेत. त्यामुळे आता मोबाईल घेऊन वर्गात येणा:या विद्याथ्र्याची तपासणी केली जाणार आहे. ज्या विद्याथ्र्याजवळ मोबाईल असतील, त्या विद्याथ्र्यासाठी महाविद्यालयातील पार्किगच्या ठिकाणी लॉकरची व्यवस्था केली जाणार आहे.

पुढील वर्षी पूर्णत: बंदी

पुढील वर्षापासून महाविद्यालयात मोबाईलला पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलो. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सेल्फी व टाईमपास करणा:या विद्याथ्र्यावर कारवाई केली जाणार आहे.

विद्याथ्र्याची तपासणी केली जाणार

यापुढे महाविद्यालयात असे प्रकार घडू नयेत, म्हणून प्राध्यापकांची शिस्त कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीतील प्राध्यापकांना विद्याथ्र्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्याचे प्राचार्यानी सूचित केले आहे. तसेच महाविद्यालयात सुरक्षारक्षक ांची नियुक्ती केली जाणार आहे. ब:याचदा विद्याथ्र्याच्या खिशात गुटखा, तंबाखू असतात, त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर विद्याथ्र्याची तपासणी केली जाणार आहे.

समिती असतानाही घडला प्रकार

विद्यापीठाने सूचित केल्याप्रमाणे महाविद्यालयात रॅ¨गंग, विशाखा व महिलांवर होणारा छळ व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन आहे. तरीही गुरुवारी महाविद्यालयात हा प्रकार घडल्यामुळे महाविद्यालयीन व्यवस्थापनाला धक्का बसला आहे. यापुढे खबरदारी म्हणून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच विद्याथ्र्याकडे लक्ष द्यावे, असे आदेश देण्यात आले आहे.

Web Title: Mobile ban at BAHATI college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.