मनपा कर्मचार्याची आत्महत्या
By Admin | Updated: May 21, 2014 01:25 IST2014-05-21T01:25:53+5:302014-05-21T01:25:53+5:30
मनपा कर्मचारी बळीराम सुकलाल देवरे (वय-५४) यांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी एका विहिरीत आढळून आला.

मनपा कर्मचार्याची आत्महत्या
जळगाव : शनीपेठ भागातील रहिवासी व मनपा कर्मचारी बळीराम सुकलाल देवरे (वय-५४) यांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील स्मशान भूमीजवळील एका विहिरीत आढळून आला. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवरे हे मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून घरातून बाहेर पडले होते. उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व शहरातील अन्य भागात शोधाशोध सुरू केली. या दरम्यान संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शिवाजी नगर भागातील विहिरीत एक मृतदेह दिसला. आजूबाजूच्या नागरिकांनी ही बाब शहर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह बळीराम सुकलाल देवरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेत प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, मयत देवरे हे अनेक वर्षांपासून मूळव्याधीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्या त्रासातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असे तपासाधिकारी डिगंबर सपकाळे यांनी सांगितले. याप्रकरणी सीताराम सुकलाल देवरे यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद आहे. रिक्षा दुभाजकावर धडकली पांडे डेअरी चौकात असलेल्या मुख्य टपाल कार्यालयाजवळ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक विना नंबरची रिक्षा दुभाजकावर जाऊन आदळली. नवीनच असलेल्या या रिक्षाची पासिंगदेखील झालेली नव्हती. अपघातात चालकाच्या पायाला दुखापत झाली.