शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

महिनाभरापूर्वी कार्यादेश दिल्यावरही जळगावात आमदारांनी थांबविली मनपाची कामे - विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:07 IST

महापौरांच्या हस्ते उद्घाटनासाठी आमदारांचा खटाटोप

ठळक मुद्देआमदारांना देखावा करवयाचा होताकामांद्वारे आरोपांना उत्तर देवू

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासासाठी मनपाला दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून कामांचा शुभारंभ शुक्रवारपासून होणार आहे. मात्र, या कामांसाठी मनपाने २४ आॅगस्ट रोजी मक्तेदाराला कार्यादेश दिले असताना देखील आमदार सुरेश भोळे यांनी मनपा प्रशासन व मक्तेदारावर दबाव आणून कामे थांबवली असल्याचा धक्कादायक आरोप मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला आहे.बुधवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी निलेश पाटील हे उपस्थित होते. सुनील महाजन म्हणाले की, २५ कोटी रुपयांचा निधी आणण्यासाठी खाविआने प्रयत्न केले होते.तसेच या निधीतून होणाऱ्या सर्व कामांचे नियोजन देखील खाविआच्या काळातच झाले.मात्र, महापौर व उपमहापौर निवडीनंतरच या कामांचा शुभारंभ करू न जळगावकरांसमोर मोठा ‘इव्हेंट’ करून या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार भोळेंचा असल्याचा आरोप सुनील महाजन यांनी केला.आमदारांनी १०० कोटीचे श्रेय घ्यावे२५ कोटीचा निधी हा खाविआनेच आणला आहे. तसेच शहरविकासासाठीच हा निधी आणला आहे. मात्र,आमदारांनी या निधीबाबत केवळ श्रेयवादाचे राजकारण केले. आमदारांनी २५ कोटी पेक्षा जो १०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्या निधीचे श्रेय घेवूनत्यांनी शहरातील कामे मार्गी लावावेत असा सल्ला देखील महाजन यांनी आमदार भोळे यांना दिला आहे.ज्या नगरसेवकांनी २५ कोटी रुपयांच्या कामांसाठी मेहनत घेतली, त्यांना तरी आमदारांनी विश्वासात घ्यायला हवे होते असेही महाजन यांनी सांगितले.मक्तेदार, मनपा अभियंतांवर टाकला दबाव !मनपाने २५ कोटीपैकी १३ कोटी रुपयांच्या कामांसाठी २४ आॅगस्ट रोजी कार्यादेश दिले होते. त्यानुसार मक्तेदारांकडून या कामांना सुरुवात देखील केली जाणार होती. मात्र, या कामांना सुरुवात ही महापौर व उपमहापौर निवडीनंतरच व्हावी अशी इच्छाआमदार भोळेंची होती. तसेचआम्ही सत्तेवर आल्यानंतर या कामांना सुरुवात केली हा देखावा आमदारांना करवयाचा होता. त्यामुळेच आमदारांनी हा खटाटोपसुरु केला असल्याचा आरोप देखील सुनील महाजन यांनी केला आहे. आमदारांनी श्रेय मिळविण्यासाठी महिनाभर विकासात्मक कामांना ब्रेक लावली आहे. तसेच मक्तेदारावर कामे सुरु करू नका यासाठी देखील दबाव टाकला असल्याचा आरोप महाजन यांनी केला.शिवसेना नगरसेवकांना अजुनही पराभव पचनी पडताना दिसून येत नाही. त्यांनी कामे केले नाहीत म्हणून जळगावकरांनी त्यांना उत्तर दिले आहे. त्यांच्या आरोपांवर उत्तर देण्यास मला स्वारस्य नसून, आम्ही या पाच वर्षात शहराचा सर्वांगिण विकास करून कामांद्वारे त्यांच्या आरोपांना उत्तर देवू.-सुरेश भोळे, आमदार

टॅग्स :Jalgaonजळगाव