शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी जळगाव शहर खड्ड्यात घातले! उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका

By सुनील पाटील | Updated: October 9, 2023 20:38 IST

‘होऊ द्या चर्चा’चे सभेत रुपांतर

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सन २०१४ पासून शहरात भाजपचे आमदार आहेत, तेव्हापासून आमदारांनी शहराला खड्डयात घातले आहे. आजही शहरवासिय खड‌्डयांमुळे नरकयातना भोगत आहेत. रस्त्याचे प्रश्न मार्गी लागत नाही. महापालिकेला काम करु दिले जात नाही. गटारी, स्ट्रीट लाईट नाही. आमदारांनी कोणतेही एक तरी ठोस काम दाखवावे असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. पिंप्राळा व हुडको या भागात ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे सोमवारी सायंकाळी सभेत रुपांतर झाले, त्यात आमदार सुरेश भोळे यांनाच टार्गेट करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाकडून ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमातून राज्य व केंद्र सरकारच्या करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड असे फलक लावून आमदारांना टार्गेट केले जात आहे. जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, गायत्री सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. भाजपे अच्छे दिनाचे आश्वासन दिले होते ते आले का?, पक्के घरकुल मिळाले का?, अरबी समुद्रात शिवस्मारक झाले का?, महागाई कमी झाली का? असे प्रश्न विचारण्यात आले. जळगाव शहरात आमदारांचे एकही ठोस काम नाही. शहराला खड्डेमुक्त करु असे आश्वासन दिले होते. आता कार्यकाळ संपण्याची वेळ आली, शहर खड्डेमुक्त झालेले नाही. उलट या शहराला खड्ड्यात घालण्याचे काम आमदारांनी केले. न झालेल्या कामांचा शुभारंभ केला जात आहे. बॅनरबाजी केली जात आहे, अशी टिका ठाकरे गटाने केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांना एक हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJalgaonजळगाव