मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासी महिलांकडून राखी बांधत रविवारी रक्षाबंधन साजरे केले. तालुक्यातील राजुरा, हलखेडा, लालगोटा, धुळे पावरीवाडा व मोरझिरा या आदिवासी गावांमध्ये जाऊन आमदार पाटील यांनी हा सण साजरा केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, अफसर खान, दीपक पवार, उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, पुंडलिक सरग, प्रफुल्ल पाटील, विभागप्रमुख विनोद पाटील, गणप्रमुख नारायण पाटील, पंकज पांडव, सतीश नागरे, अविनाश वाढे, दीपक वाघ, दिलीप भोलाणकर, शैलेश पाटील, संदीप डिवरे, नितीन कासार, राहुल खिराळकर, पंकज धाबे, योगेश मुळक, हरदास भगत, ऋषी पाटील, राहुल पाटील, राजू तायडे, गजानन पाटील, श्रावण धांडे, सचिन शर्मा, अनारसिंग पावरा आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आदिवासी पाड्यांवर रक्षाबंधन साजरे करताना आमदार चंद्रकांत पाटील. सोबत छोटू भोई, सुनील पाटील आदी. (छाया : विनायक वाडेकर)