मू.जे. महाविद्यालयाने पटकावले जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST2021-02-11T04:18:10+5:302021-02-11T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने मंगळवारी भरतमुनी जयंतीनिमित्ताने शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

मू.जे. महाविद्यालयाने पटकावले जेतेपद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने मंगळवारी भरतमुनी जयंतीनिमित्ताने शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जळगाव ग्रामीण विभागातून भालेराव प्रतिष्ठान आणि शहरी विभागातून मू.जे. महाविद्यालयाने जेतेपद पटकावले. ही स्पर्धा ब्राम्हण सभेत पार पडली.
स्पर्धेचा निकाल (प्रथम,द्वितीय, तृतीय अनुक्रमे)
जळगाव ग्रामीण - सांघिक - अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, वरणगाव, गुरुदेव, गुरुदेव सेवा मंडळ कोळंबा, स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा खु, वैयक्तिक गटात प्रथम पंकज पाटील, चोपडा, प्रणव विनोद ईखे, नीलेश पाटील, सोनवद, गायत्री रामेश्वर चौधरी.
सांघिक गट - मू.जे. महाविद्यालय, प्रभो शिवाजी राजा, विनोद मोसिकी ग्रुप
उत्तेजनार्थ - स्वराज्य गृप, वैयक्तिक श्रुती वैद्य, सतीश भटुनागे, पियूषा नेवे, उत्तेजनार्थ पूजा मगर
पारितोषिक वितरणप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, दीपक सूर्यवंशी माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. राधेश्याम चौधरी , सरचिटणीस महेश जोशी, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, महिला आघाडी सरचिटणीस रेखा वर्मा हे उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक गीतांजली ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभाग विशाल जाधव, ज्ञानेश्वर पाटील, शिवानी खोडपे, भावेश पाटील योगेश लांबोळे, शुभम सपकाळे, आकाश भारंबे, कृष्णा बारी, जयेश सोनवणे, समाधान कोळी, मिथुन पाटील, रोहन शिंपी, सागर,चावरिया, मयूर भंगाळे, जयेश चव्हाण, पीयूष पाटील यांनी परिश्रम घेतले.
फोटो - पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित विशाल जाधव, गीतांजली ठाकरे, आमदार सुरेश भोळे,सुनील खडके, दीपक सूर्यवंशी आणि इतर.