ओपडीत डॉक्टर नसल्याचा मुद्दा गैरसमजातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:21 IST2021-02-27T04:21:13+5:302021-02-27T04:21:13+5:30
जळगाव : माझ्याकडे फैजपूर आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार असल्याने आपण काही दिवस तिकडे तर काही दिवस जिल्हा परिषदेतील बाह्य ...

ओपडीत डॉक्टर नसल्याचा मुद्दा गैरसमजातून
जळगाव : माझ्याकडे फैजपूर आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार असल्याने आपण काही दिवस तिकडे तर काही दिवस जिल्हा परिषदेतील बाह्य रुग्ण विभागात कार्यरत असतो, त्यामुळे ओपीडीत डॉक्टर नसल्याचा मुद्दा हा गैरसमजाने मांडला गेला असावा, असे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ठाकूर यांनी दिले आहे. आरोग्य समितीच्या सभेत जि.प. ओपीडीत डॉक्टर नसल्याने ही ओपीडी बंद करावी, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
गुरुवारी न्हावी येथे एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून कर्मचाऱ्यांची आपण त्या ठिकाणी बैठक घेत होतो. तशी कल्पना आपण वरिष्ठांना दिली होती. आरोग्य सभापतींच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली होती, असेही डॉ. ठाकूर यांनी म्हटले आहे.