पथराड येथील बेपत्ता तरुणाचे आढळले मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:23 IST2019-09-14T22:23:10+5:302019-09-14T22:23:15+5:30
पथराड, ता. धरणगाव : येथील अतुल आबा महाडिक (वय २३) या सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचे मृतदेह शनिवारी कुजलेल्या ...

पथराड येथील बेपत्ता तरुणाचे आढळले मृतदेह
पथराड, ता. धरणगाव : येथील अतुल आबा महाडिक (वय २३) या सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचे मृतदेह शनिवारी कुजलेल्या अवस्थेत आढळले.
याबाबत पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दुपारी साडेतीच्या दरम्यान गावाजवळ एका शेतात त्याचे मृतदेह आढळले. त्याचे प्राण्यांनी हातपाय कुरतडल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावात खळबळ निर्माण झाली असून ही हत्या की आत्महत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, अतुल हा पाळधी येथे एका कंपनीत कामाला जात होता. त्याच्या अशा मृत्यूमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये गूढ निर्माण झाले आहे.