बेपत्ता महिला डॉक्टर अखेर गवसली
By Admin | Updated: May 13, 2014 00:22 IST2014-05-13T00:22:00+5:302014-05-13T00:22:00+5:30
पाचोरा : शहरातील एक डॉक्टर महिला वैफल्यग्रस्त स्थितीत गेल्या ११ रोजी दुपारी मुलासह अचानक घरातून निघून गेली होती.

बेपत्ता महिला डॉक्टर अखेर गवसली
पाचोरा : शहरातील एक डॉक्टर महिला वैफल्यग्रस्त स्थितीत गेल्या ११ रोजी दुपारी मुलासह अचानक घरातून निघून गेली होती. मोबाईलमुळे तिचा तपास लागला. यानंतर कुर्ला येथील पोलिसांनी तिला पाचोरा येथे घरी पाठविले. नेमक्या कोणत्या कारणाने ही डॉक्टर त्रस्त झाली असेल याबाबत मात्र शहरात चर्चा होती . ही महिला एका डॉक्टरची पत्नी असून पाचोर्यात एक हॉस्पिटल हे डॉक्टर दाम्पत्य चालविते. उच्चभ्रू असूनही वैफल्यग्रस्त परिस्थितीत ही महिला डॉक्टर चार वर्षाच्या मुलास घेऊन रविवारी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबातील सदस्यांनी दोघांचा शोध घेतला परंतु ते दोघेही मिळून आले नाही. अखेर पाचोरा पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद केली. पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविता डॉक्टर पतीस अक्षरश: रडू आले. त्यावेळी त्या महिला डॉक्टरचा मोबाईल आला. मात्र गावाचे नाव कळत नसल्याने जिल्हा गुन्हा अन्वेशन जळगावकडून मोबाईल कंपनीशी संपर्क साधण्यात आला. त्यात ती महिला मुंबई कुर्ला स्टेशन परिसरात असल्याचे समजले. तात्काळ तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्या महिलेस सुखरुप घराकडे मार्गस्थ करण्यात आले व डॉक्टर पतीने सुटकेचा श्वास घेतला. या घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही . (वार्ताहर)