बोदवड पोलिसांच्या मदतीने हरविलेला बालक सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:29+5:302020-12-05T04:24:29+5:30
याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील दर्यापूर वरणगाव फॅक्टरी येथील गणेश शांताराम भालेराव यांचा तीनवर्षीय शौर्य हा मुलगा ...

बोदवड पोलिसांच्या मदतीने हरविलेला बालक सापडला
याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील दर्यापूर वरणगाव फॅक्टरी येथील गणेश शांताराम भालेराव यांचा तीनवर्षीय शौर्य हा मुलगा बोदवड येथे भीमनगरमध्ये मामाकडे आला होता. मात्र तो गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता घराजवळून खेळता खेळता लांब निघून गेला व हरवला. यानंतर काहींनी त्याला बोदवड पोलीस ठाण्यात आणले व बोदवड पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गोपाळ गव्हाळे यांनी शहरात सोशल मीडियाच्या साह्याने सदर बालकाचा फोटो शेअर केला. कार्यावर हजर असलेले पोलीस उद्दल चव्हाण, संदीप वानखेडे, सचिन चौधरी, नीलेश सिसोदे यांना तो आढळून आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत खेळणी, चॉकलेट आणून देत रडणे थांबविले. रात्री ८ वाजता सदर बालकाचे मामा हे सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात आले. पोलिसांना ओळख पटवून दिल्याने त्यांच्या ताब्यात या बालकाला सोपविले. काही तासातच हा बालक आईच्या कुशीत विसावल्याने त्याला शोधत असलेले भीमनगरवासीही सुखावले. तर सदर कार्याबाबत बोदवड पोलिसांचे कौतुक होत आहे.
===Photopath===
041220\04jal_1_04122020_12.jpg
===Caption===
पोलीस ठाण्यात मुलाला ताब्यात घेताना मामा.