मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:39+5:302021-07-28T04:17:39+5:30
जळगाव : ज्येष्ठ शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ...

मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
जळगाव : ज्येष्ठ शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी शहरातील विविध शाळांध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम होऊन, विद्यार्थांना डॉ.कलाम यांची माहिती देण्यात आली.
राज प्राथमिक विद्यालय
मेहरूण परिसरातील राज प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थांना डॉ. कलाम यांच्या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन एस. ए. खंडारे यांनी तर आभार एस. ए. पाटील यांनी मानले.
जैन माध्यमिक विद्यालय
कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ शिक्षिका मोहिनी चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात कार्तिक दुसाने, दीपा गुप्ता, संदेश तिवारी, प्रशांत कवळे, प्रणाली गायकवाड, रजनी तायडे, कुणाल पाटील, कृष्णा मराठे, आशिष राठोड, शिफा शेख, सिमरन तडवी, खुशबू राठोड या विद्यार्थांना डॉ.कलाम यांच्याबद्दल माहिती दिली. यशस्वीतेसाठी रोहिणी सोनवणे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, अविनाश महाजन, नरेश कोळी, तुषार वानखेडे, दीपक भोळे यांनी परिश्रम घेतले.
सुजय विद्यालय
येथील सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका अर्चना सुर्यवंशी यांच्याहस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. यानंतर गौरव सरोदे, रविराज बंजारा या विद्यार्थांनी डॉ. कलाम यांच्य कार्याबद्दल भाषण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश पाटील, पूजा तिवटे, मुक्ता देशमुख आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
मानव सेवा विद्यालय
मानव सेवा विद्यालयात मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांच्याहस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थांनी डॉ.कलाम यांच्यावर ऑनलाईन निबंध सादर केले. यावेळी माया अंबटकर, मुक्ता पाटील आदी शिक्षकवर्ग उपस्थित होते.
जय दुर्गा माध्यामिक विद्यालय
जय दुर्गा प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक सागर कोल्हे व ज्येष्ठ शिक्षिका ज्योती पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थांनी ऑनलाईन द्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला.