शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

मागासवर्ग महामंडळात गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 11:04 IST

तिघांचे निलंबन झाल्याची माहिती: योजना स्थगित ठेवण्याचे पत्र

जळगाव : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील बीज भांडवल योजनेतील बोगस कर्जप्रकरणातील कारवाई गतिमान होण्याची चिन्हे आहे. या प्रकरणात पंधरा ते वीस दिवसांपूर्वी तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकांसह तिघांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़ दरम्यान, गैरप्रकारामुळे सुधारीत मान्यताप्राप्त होईपर्यंत ही योजना स्थगित ठेवावी असे पत्रही महामंडळाला प्राप्त झाले आहे.महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची ५० हजार ते ५ लाखांपर्यंतची प्रकल्प मर्यादा असलेल्या बीजभांडवल योजनेअंतर्गत जिल्ह्यात महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, बँक कर्मचारी व दलाल व्यक्तिंच्या संगनमतनाने बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस लाभार्भी तयार करून कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली. २०१२ ते २०१९ दरम्यान ही बोगसप्रकरणे असल्याचे समजते. या प्रकरणाची विभागस्तरावरून चौकशी सुरू आहे़ या चौकशी दरम्यान, गैरप्रकार झाल्याचे प्राथमिक स्तरावर निष्पन्न झाल्यानंतर तिघांचे पंधरा दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी सुरू असून यासंदर्भात अधिक वाच्यता करता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, यात लवकरच ठोस कारवाई व अनेकांची चौकशी होणार असल्याचेही सांगण्यात आले. महामंंडळाच्या स्थानिक कार्यालयात माहिती घेतली असता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला.वरिष्ठ पातळीवरून ही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, चौकशीसाठी काही फाईल्सही ताब्यात घेतल्या आहेत.आॅनलाईन नवी योजना सुरू करणारजळगावप्रमाणे अन्य जिल्ह्यात बोगस लाभार्थ्यांची कर्जप्रकरणे मंजूर होणार नाहीत, या अनुषंगाने सद्यस्थितीतील योजनेत सुधारणा करून आॅनलाईन पद्धतीने नवीन योजना सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे पत्र स्थानिक महामंडळाच्या कार्यालयास २१ मे रोजी प्राप्त झाले आहे.अर्ज न स्वीकारण्याचे आदेशगैरप्रकारची चौकशी सुरू असल्याने बीजभांडवल या योजनेअंतर्गत कोणतेही अर्ज स्वीकारू नयेत तसेच पूर्वी स्वीकारलेले अर्ज बँकेने मंजूर केलेल्या प्रकरणात कोणतेही अनुदान व बीज भांडवल मंजूर करण्यात येऊ नये, असे आदेश आहेत. आदेशाचे उल्लंंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सर्व प्रादेशिक व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापकांना दिला आहे़ संचालक कमलाकर फंड यांनी हे पत्र दिले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव