शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

वरिष्ठ लिपिकाने हाताळली अल्पसंख्यांक आयोगाची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:09 IST

अनेक विभागाच्या अधिकाºयांना माहितीसाठी काढले बाहेर

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती

जळगाव : राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाºयांसह विविध विभागांच्या अधिकाºयांची बैठक अध्यक्षांसोबत आलेल्या अल्पसंख्यांक आयोगाच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ लिपिकानेच हाताळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अध्यक्षांनी मात्र आढावा आटोपल्यावर अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सोडविण्याचे आवाहन करीत समारोप केला.राज्याचे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच पदभार घेतला असून अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या, प्रश्न समजावेत, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करता यावेत, यासाठी राज्याच्या दौºयावर निघाले असून आतापर्यंत २६ जिल्ह्यांचा दौरा करून बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी ते जळगाव दौºयावर आले होते. सकाळी त्यांनी विश्रामगृहावर जैन, शिख, बौद्ध व मुस्लीम या अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळांशी चर्चा करून दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक/निरंतर), सेवायोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, लिड बँक मॅनेजर, जिल्हा वक्फ अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्या सोबत पंतप्रधानाचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.या बैठकीस पोलीसांचा प्रतिनिधी नव्हता. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीही नव्हते. मात्र जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह शिक्षण व इतर विभागांचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.अधिकाºयांना माहिती घेण्यासाठी हॉलबाहेर काढलेशिक्षणाधिकारी निरंतर, तसेच उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सुरवसे यांनी विचारलेल्या मुद्यांची माहिती नसल्याने त्यांना आधी जिल्हाधिकाºयांनी झापले. तर सुरवसे यांनी या अधिकाºयांना बाहेर जाऊन फोनवरून माहिती घ्या, मग येऊन सांगा, असे सुनावत बाहेरचा रस्ता दाखविला.अन् वरिष्ठ लिपिकाने घेतला बैठकीचा ताबादुपारी तीन वाजेच्या सुमारास आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे बैठकस्थळी आगमन झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ लिपिक गणेश सुरवसे तसेच स्वीय सहायक व इतर काही मंडळी होती. तसेच स्थानिक काही कार्यकर्तेही या बैठकीच्या हॉलमध्ये शिरले होते. या सगळ्यांच्या उपस्थितीतच बैठकीला सुरूवात झाली. अध्यक्षांच्या एका बाजूला जिल्हाधिकारी तर दुसºया बाजूला वरिष्ठ लिपिक सुरवसे बसले होते. अध्यक्षांच्यावतीने सुरवसे यांनीच बैठकीस सुरूवात करीत विभागनिहाय अधिकाºयांकडून आढावा घेतला.सुरवसे यांनी पद सांगणे टाळलेबैठकीत आढावा घेणारे सुरवसे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांनीच आढावा घेतला. माझे नाव बातमीत घेऊ नका, असे सांगितले. त्यांना तुमचे पद वरिष्ठ लिपिक आहे का? अशी विचारणा केली असता त्यापेक्षा मोठे पद असल्याचे सांगत फोन कट केला.आढावा आयोगाच्या अध्यक्षांनीच घेतला. त्यांना कोणीही त्यासाठी सहकार्य करू शकतो. त्यामुळे वरिष्ठ लिपिकाने आढावा घेतला, असे म्हणता येणार नाही. त्यांना फक्त विचारलेली माहिती दिली. सोलापूरला देखील आढाव्यासाठी अध्यक्षांसोबत हेच आले होते. -अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.आयोगाच्या अध्यक्षांनीच आढावा घेतला. तसेच माझे पद वरिष्ठ लिपिकापेक्षा मोठे आहे. -गणेश सुरवसे.