सायकल चालवायला दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलावर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:44+5:302021-03-28T04:15:44+5:30
जळगाव : सायकल चालवायला दिली नाही म्हणून यश सुरेश पवार या १४ वर्षीय मुलावर चाकूने वार करीत जखमी ...

सायकल चालवायला दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलावर चाकूने वार
जळगाव : सायकल चालवायला दिली नाही म्हणून यश सुरेश पवार या १४ वर्षीय मुलावर चाकूने वार करीत जखमी केल्याची घटना २५ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास धनाजी काळे नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात घडली. या प्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश सुरेश पवार याला त्यांच्या मागच्या गल्लीतील एका मुलाने सहा दिवसांपूर्वी सायकल चालवण्यासाठी मागितली होती. परंतु यशने सायकल देण्यास नकार दिल्याने त्या मुलाने यशला चाकूने मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान,२५ रोजी सायंकाळी यश हा मित्रांसह सायकलने जात असताना हल्लेखोर मुलाने यशच्या सायकलवर त्याची सायकल घातली. यश हा त्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता मुलाने त्याच्या हातातील छोट्या चाकूने यशच्या पोटावर व पायावर वार करीत त्याला जखमी केले. दरम्यान यशच्या आईने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ओमप्रकाश सोनी करीत आहे.