अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:13 IST2019-06-13T21:13:19+5:302019-06-13T21:13:57+5:30
निमखेडी येथील घटना

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले
चाळीसगाव : निमखेडी येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी विजय निंबा ठाकरे (वय १९, रा. निमखेडी ता. चाळीसगाव) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात बाल लैंगिक शोषण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपीने सबंधीत अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत शारिरिक संबंध प्रस्थापित केले. सात रोजी त्याने मुलीस पळवून नेले होते. यानंतर नातेवाईकांच्या मदतीने शोधाशोध करुन दोघांना पोलिस स्थानकात आणण्यात आले. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश घोळवे करीत आहे.