अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:11 IST2021-01-01T04:11:49+5:302021-01-01T04:11:49+5:30

जळगाव : जुने नशिराबाद रस्ता परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात शनिपेठ पोलिसांनी गुरूवारी एकाला ...

Minor kidnapper arrested | अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-यास अटक

अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-यास अटक

जळगाव : जुने नशिराबाद रस्ता परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात शनिपेठ पोलिसांनी गुरूवारी एकाला अटक केली आहे. राहुल भिका जोहरी (२१, रा. चिंचखेडा, ता. जामनेर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. २७ डिसेंबर रोजी रात्री अल्पवयीन मुलीस कारमधून आलेल्या चौघांनी पळवून नेले होते.

चिंचखेडा येथून अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, संशयित आरोपी राहूल जोहरी हा तिला चिंचखेडा येथे घेवून गेल्याचे पोलिसांना कळले. शनीपेठ पोलीसांचे पथक चिंचखेडा रवाना झाले. बुधवार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेवून संशयित आरोपी राहुल जोहरी याला अटक केली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात राहूल याच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये आणि पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Minor kidnapper arrested