जामनेर : सण, उत्सव साजरे करतांना पोलिसांची गरज पडायला नको, मात्र आपल्या देवांच्या उत्सवाचे टेंशन पोलीस प्रशासनाला असते. उत्सवातील भांडणांचे मुळ दारुतच आहे. दारु, गुटखा खावुन मिरवणुकीत नाचणे हे धार्मिक विटंबनच आहे. हे थांबायला हवे. गणेशोत्सवाचे पावित्र जपावे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी येथे केले.गणेशोत्सव, मोहरम व दुर्गोत्सव या पार्श्वभुमीवर बाबाजी राघो मंगल कार्यालयात पहुर व जामनेर पोलिस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी, पोलिस पाटील व शांतता समिती सदस्यांची समन्वय बैठक झाली. यावेळी महाजन बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर होते. महाजन यांनी सांगितले की, आम्ही गोष्टी एकविसाव्या शतकाच्या करतो व गावाबाहेर उघड्यावर शौचास बसतो, हे न शोभणारे आहे. शौचालय बांधण्यासाठी शासन मदत करते तरी आम्ही गाव हगणदारी मुक्त करु शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शासनाकडून सहकार्य तरीही हगणदरीमुक्ती न झाल्याची खंत : जलसंपदामंत्री गिरीष महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:00 IST
सण, उत्सव साजरे करतांना पोलिसांची गरज पडायला नको, मात्र आपल्या देवांच्या उत्सवाचे टेंशन पोलीस प्रशासनाला असते. उत्सवातील भांडणांचे मुळ दारुतच आहे. दारु, गुटखा खावुन मिरवणुकीत नाचणे हे धार्मिक विटंबनच आहे. हे थांबायला हवे. गणेशोत्सवाचे पावित्र जपावे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी येथे केले.
शासनाकडून सहकार्य तरीही हगणदरीमुक्ती न झाल्याची खंत : जलसंपदामंत्री गिरीष महाजन
ठळक मुद्देजामनेरला शांतता समिती बैठकसण व उत्सवांचे पावित्र्य राखाउत्सवा दरम्यान मद्यप्राशन करणे टाळा