वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चेच अधिराज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:49 PM2019-12-16T12:49:48+5:302019-12-16T12:50:35+5:30

मान्यवरांचे गौरवोद्गार : ४२ व्या वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

In the minds of the readers, 'Lokmat' is the kingdom | वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चेच अधिराज्य

वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चेच अधिराज्य

Next

जळगाव : पाड्यापासून ते जागतिक पातळीपर्यंतची इत्यंभूत माहिती तत्परतेने वाचकांपर्यंत पोहोचविण्यासह सत्य जनतेसमोर मांडण्याचे विश्वासार्ह काम ‘लोकमत’ करीत असल्यानेच व सरकार कोणाचेही येवो, वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चे अधिराज्य कायम आहे, असे गौरद्गार ‘लोकमत’ जळगाव आवृत्तीच्या ४२व्या वर्धापन दिन सोहळ््यात मान्यवरांनी काढले.
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचा ४२ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, १५ डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहतमधील ‘लोकमत’ कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी हा सूर उमटला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी स्वत: उपस्थित राहून तर काहींनी भ्रमणध्वनी, दूरध्वनी व सोशल मीडियाद्वारेही शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा़पी़पी.पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी सहकार राज्यमंत्री आमदार गुलाबराव पाटील, महापौर सीमा भोळे, ‘शाकाहार सदाचार’चे प्रणेते रतनलाल सी.बाफना, आमदार लता सोनवणे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जनता बॅँकेचे अध्यक्ष अनिल राव, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर रमेशदादा जैन, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले उपस्थित होते.
गुुलाबी थंडीत सायंकाळी सहा वाजता ‘लोकमत’च्या हिरवळीवर या स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात झालेले बदल, प्रगती तसेच तंत्रज्ञानामुळे झालेले परिवर्तन याची प्रातिनिधीक स्वरुपात माहिती असलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात ‘लोकमत’च्या ४२ वर्षांच्या प्रवासाची तसेच ‘प्रिंट टू डिजिटल’ अशा प्रगतीची माहिती देण्यात आली
गुलाबी थंडीत रंगला स्नेहसोहळा
खान्देशी मातीची, माणसाची शान आणि मान उंचावणाऱ्या ‘लोकमत’ने रविवारी संध्याकाळी शेकडो वाचक आणि हितचिंतकांच्या साक्षीने ४२व्या वर्षात पदार्पण केले. वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत भवनासह परिसरात आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली होती. हितचिंतक आणि वाचकांचे आगमन होत असताना सनईचे मंजुळ स्वर वातावरणात रंगत आणत होते. गुलाबी थंडी, दुधाचा गोडवा आणि वाचकांच्या प्रेमामुळे वातावरण धुंद झाले होते. रोशणाईचा लखलखाट व गुलाबी थंडी अशा आल्हाददायक वातावरणात शुभेच्छांचा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. या वेळी आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, माजी आमदार हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवानी, संतोष चौधरी, सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे, सी.ए. अनिल शहा, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, सहायक सरकारी वकील मोहन देशपांडे, अ‍ॅड.सुरेंद्र काबरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ‘लोकमत’चे उपसंपादक विलास बारी यांनी केले.

‘लोकमत’शी जवळचे नाते-गुलाबराव पाटील
वृत्तपत्र व लोकप्रतिनिधी यांचे जवळचे नाते आहे. त्यात ‘लोकमत’शी तर अगदी घट्ट नाते आहे. कारण आमचे काही चुकले तर त्याविषयी ‘लोकमत’ बातमीच्या स्वरुपातून जशी जाणीव करून देते तसे चांगल्या कामाबद्दल कौतुकाची थापही देते, असा उल्लेख गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात आवर्जून केला.‘लोकमत’च्या बातम्यांमुळेच मला १९९९ मध्ये सर्वप्रथम उमेदवारी मिळण्यास मदत झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.

पाया ढासळू न देता ‘लोकमत’ची उत्तरोत्तर प्रगती - डॉ. उल्हास पाटील
‘लोकमत’ची सुरुवात व ४२ वर्षांचा प्रवास पाहता सुुरुवातीपासूनच त्याच्या प्रगतीत सातत्य आहे. ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेमुळे दररोज वाचक ‘लोकमत’ची प्रतीक्षा करीत असतात. एवढी प्रगती केली तरी ‘लोकमत’ने ज्या पायावर ही झेप घेतली आहे, तो पाया ढासळू दिलेला नसल्याचे गौरोद्वगार डॉ. उल्हास पाटील यांनी काढले.

सत्यतेच्या बळावरच ‘लोकमत’ लोकप्रिय - अरुणभाई गुजराथी
समाजकारण असो की राजकारण सर्व घटकांना न्याय देण्याचे काम ‘लोकमत’ करीत असून सत्यतेच्या बळावरच ‘लोकमत’ लोकप्रिय असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी नमूद केले. वृत्तपत्रातील संपादकीय महत्त्वाचे असून ‘लोकमत’चे संपादकीय पान तसेच लेखन, बातमीची शैली उत्तम असल्यानेच ‘लोकमत’ची वाचकसंख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: In the minds of the readers, 'Lokmat' is the kingdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.