गिरणा पुलावरील संरक्षण कठडे गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST2021-09-15T04:19:59+5:302021-09-15T04:19:59+5:30
भातखंडे बुद्रुक ता. भडगाव : गिरड येथील गिरणा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे महापुरात वाहून गेले. यामुळे हा पूल धोकादायक ...

गिरणा पुलावरील संरक्षण कठडे गेले वाहून
भातखंडे बुद्रुक ता. भडगाव :
गिरड येथील गिरणा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे महापुरात वाहून गेले. यामुळे हा पूल धोकादायक ठरू शकतो. या ठिकाणी त्वरित संरक्षण कठडे बसविले जावेत, अशी मागणी होत आहे.
मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मन्याड तितूर व गिरणा नद्यांना पूर आला होता. गिरड येथील गिरणा पूल दोन दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. पुराचा प्रवाह जोरात असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे पुलावरील नवीन केलेले ओतीव काम वाहून गेले. गिरणा नदीवरील कठडे दुरुस्त करण्यात यावे, तेथे साचलेला कचरा काढण्यात यावा, पुलाची उंची कमी असल्याने लगेच पुलावर पाणी येते, त्यामुळे पुलांची उंची वाढवून मिळावी. यासह येते नवीन पूल असावा, अशी मागणी होत आहे.
गिरड येथील गिरणेवरचा हा पूल परिसरातील बऱ्याच गावांना जोडल्याने रहदारी अवजड वाहतूक ऊस, केळी, पेरू, लिंबू, कापूस शेतीमाल व प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतूक यांच पुलावरून होते. मात्र, पुराच्या पाण्यात पुलांचे दोन्ही बाजूंची सरंक्षण कठडे वाहून गेली आहेत. भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येते नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर साचलेली घाण व कठडे दुरुस्ती करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
----
[ फोटो गिरड येथील गिरणा पुलावरील वाहून गेलेले संरक्षण कठडे व पुलावरील साचलेली घाण ]
छाया चित्र संदीप पाटील गिरड १५/१