इव्हेंट साधून लाखोंची उलाढाल
By Admin | Updated: January 1, 2016 00:02 IST2016-01-01T00:02:51+5:302016-01-01T00:02:51+5:30
. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 31 डिसेंबरसाठी तब्बल एक लाख एकदिवसीय दारू पिण्याचे वैयक्तिक परवाने वाटप करण्यात आले होते.

इव्हेंट साधून लाखोंची उलाढाल
नंदुरबार : नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळनंतर ठिकठिकाणी विविध उपक्रमांना सुरुवात झाली होती. सार्वजनिक इमारती आणि खासगी हॉटेल्स यांच्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 31 डिसेंबरसाठी तब्बल एक लाख एकदिवसीय दारू पिण्याचे वैयक्तिक परवाने वाटप करण्यात आले होते. त्यातून जवळपास पाच लाखांचा महसूल विभागाला मिळाला. दरम्यान, मद्य पिऊन आणि भरधाव वाहन चालविणा:यांवर पोलिसांनी विविध माध्यमातून नजर ठेवली होती. नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर मद्य व मांस रिचवले जाते. त्यासाठी अनेक ठिकाणी जेवणावळी, ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाच्या स्वागतासाठी काहींनी विधायक उपक्रम आयोजित केले होते. तर काहींनी नेहमीप्रमाणे पाटर्य़ाचे आयोजन केले आहे. त्यासाठी हॉटेल्स, ढाबे, फार्म हाऊस आणि शेतांमधील मळ्यांमध्ये सोय करण्यात आली होती. हा इव्हेंट साध्य करण्यासाठी हॉटेल्स व ढाबेमालकांनीदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. अनेक ठिकाणी साग्रसंगीत अर्थात ऑर्केस्ट्रासह भोजनाची मेजवानी देण्याचा प्रय} करण्यात आला तर काही ठिकाणी डीजेची धूम सुरू होती. काहींनी विशिष्ट बिलांवर गिफ्ट किंवा सवलत देण्याची योजना लागू केली होती. काहींनी खास फॅमिलींसाठी सोय केली. मद्य विक्रीचेदेखील उत्पादन शुल्क विभागाने उद्दिष्ट ठरवून घेतले होते. त्यासाठी बनावट मद्यावर नजर ठेवण्यात आली. त्याचअंतर्गत शहादा येथे 35 लाखांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात मध्य प्रदेशातून मोठय़ा प्रमाणावर बनावट मद्य येत असते. शिवाय गुजरातमध्ये मद्यावर बंदी असल्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीतून अवैध मद्याचीही मोठय़ा प्रमाणावर वाहतूक केली जाते. त्यामुळे अशा वाहतुकीवर व विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष नजर ठेवली होती. मद्य पिणा:यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाने देण्याची सोय केली होती. काहींकडे आजीवन तर काहींकडे वर्षभराच्या कालावधीचे परवाने असतात. अशा परवानाव्यतिरिक्त एक दिवसीय परवान्यांचेदेखील वितरण केले गेले. जवळपास एक लाख परवाने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मांस विक्री 31 डिसेंबरसाठी मांस विक्रेत्यांनी दोन दिवस आधीपासूनच नियोजन करून ठेवले होते. गावरान कोंबडीचे भाव किलोला 260 ते 300 रुपये होते. बोकडच्या किंमतीदेखील 200 ते 300 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले. नेहमीपेक्षा तिप्पट ते चौपट पटीने मांस विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.