बंद घरातून सव्वासात लाखांचा ऐवज चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:17+5:302021-06-26T04:13:17+5:30

चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौकात कापड व्यावसायिक कपिल दुर्गाप्रसाद अग्रवाल वरच्या मजल्यावर तर त्यांचे लहान भाऊ खालच्या मजल्यावर राहतात. ...

Millions stolen from a closed house | बंद घरातून सव्वासात लाखांचा ऐवज चोरीस

बंद घरातून सव्वासात लाखांचा ऐवज चोरीस

चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौकात कापड व्यावसायिक कपिल दुर्गाप्रसाद अग्रवाल वरच्या मजल्यावर तर त्यांचे लहान भाऊ खालच्या मजल्यावर राहतात. अमरावती येथे नातेवाइकांच्या लग्नासाठी सर्व कुटुंब गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत जिन्यावरून प्रवेश करीत कुलूप तोडले. बेडरूममधील लॉकरमध्ये ठेवलेली साडेचार लाख रुपयांची रोकड व १८ ते २० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

घरातील सामान फेकले

कपिल अग्रवाल व त्यांचे कुटुंब शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता अमरावती येथून घरी परत आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसला. घरातले सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. लॉकरमधील रोख रक्कम व दागिने नव्हते.

त्यामध्ये ४५ हजार रुपये किमतीच्या दोन बांगड्या, ७५ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र, ३५ हजार रुपये किमतीच्या तीन जोड कानातील टॉप्स, ६० हजार रुपये किमतीचे फॅन्सी मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीची चैन, ३५ हजार रुपये किमतीच्या अंगठ्या, साडेसात हजार रुपयांची बिंदी, १५ हजार रुपये किमतीची कानातील साखळी असा ऐवज होता. सकळी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी शहरातील सर्व भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Millions stolen from a closed house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.