भुसावळातील जुन्या तहसील कार्यालयात लाखोंचा ऐवज धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:29+5:302021-06-16T04:23:29+5:30
सन २०१६ पासून तहसील कार्यालय नवीन इमारतीमध्ये सुरू करण्यात आले. जुन्या इमारतीत गत पाच वर्षांपासून जनरेटर हे पडून ...

भुसावळातील जुन्या तहसील कार्यालयात लाखोंचा ऐवज धूळखात
सन २०१६ पासून तहसील कार्यालय नवीन इमारतीमध्ये सुरू करण्यात आले. जुन्या इमारतीत गत पाच वर्षांपासून जनरेटर हे पडून आहे. तसेच एक लाकडी कपाट, चार लोखंडी कपाट, जुने रजिस्टार कार्यालयात एक ए.सी., संजय गांधी निराधार कार्यालयातील टेबल खुर्च्या, पुरवठा व कोषागार विभागात टेबल खुर्च्या असे लाखोंचे साहित्य धूळखात पडून आहे.
नवीन तहसील कार्यालयात वीजपुरवठा खंडित झाल्यास तहसीलदारांच्या दालनात व निवडणूक शाखेत इन्व्हटरची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर कार्यालयात मात्र पर्यायी व्यवस्था नाही.
तहसीलदार म्हणतात...
नवीन तहसील कार्यालयात जनरेटर मंगळवारी शिफ्ट करण्यात येईल. बाकी असलेल्या विभागातील कार्यालयाची सामग्री देखरेख म्हणून ठेवलेली आहे. जुन्या तहसील कार्यालयातील विभागात तलाठी तेथे जाऊन काम करतात.
-दीपक ढिवरे, तहसीलदार, भुसावळ